बिग बॉस मराठी – दिवस ३० – बिग बॉस च्या घरात पाणी कपात, पाणी हवे असेल तर बाहेर नळावर जाउन पाणी भरा – बिग बॉसचा आदेश

big boss marathi day 30

बिग बॉस मराठी : दिवस ३० – आजचा दिवस सुरू झला तो मधुर संगिताने, नेहमी प्रमाणे मेघा आपल्या सवयी प्रमाणे उठल्या उठल्या संगीताच्या तालावर थिरकायला लागली, मग हळूहळू सर्व जन मनात नसतानाही झोपेतून उठून जागे होऊ लागले, पण कुणालाच या गोष्टीची कल्पना नव्हती की आजचा दिवस त्यांच्यासमोर बिग बॉस ने कसा मांडून ठेवलाय, घरात एकही नळाला पाणी नव्हते, सर्व जन निसर्गाच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी तळमळत होते पण घरात पाण्याचा थेंबही नाही मग जाणार तर कुठे जाणार. पण कुणालाही कल्पना नव्हती की हा एक टास्क चा भाग आहे

बिग बॉस ने सर्वाना एका जागी बसौन मेघा ला नवीन टास्क समजवण्याची जबाबदारी दिली, “थेंबे थेंबे तळे साचे” हे टास्क चे नाव, या टास्क च्या दरम्यान बिग बॉस ने ठरवल्या प्रमाणे घरातल्या सदस्याना दोन भागात विभागले गेले, एका टीम मधे राजेश, सुशांत, रेशम, जुई, स्मिता आणि भूषण तर दुसर्या टीम मधे आस्ताद, मेघा, सई, आउ, ऋुतुजा आणि पुष्कर होते, हा एक साप्ताहिक टास्क आहे आणि दोन्ही टीम ला अंगणात लावलेल्या नळातुन एका बादलीच्या सहायाने एक ड्रम आणि एक मातीची छोटी घागर भरायची आहे, नळाला पाणी थोडे थोडे करून येईल आणि दोन्ही टीम ला शक्ति पेक्षा युक्ती श्रेष्ठ या म्हणीचा आदर्श ठेऊन टास्क करायचा आहे.

टास्क सुरू झला तेव्हा पहिला राउंड नीट पार पडला, पण दुसर्या राउंड नंतर दोन्ही टीम ने कंबर कसली आणि चाळीतल्या नळावर जसे लोक पाणी भरतात तसे काहीसे पाहायला मिळाले, राजेश ने नेहमी प्रमाणे शक्तीच्या बळावर एक माठ भरण्यास यशस्वी झाला. पण परिस्थिती अशी होती की सर्व शक्तिशाली पुरूष एका टीम मधे आणि दुसर्या टीम मधे पुष्कर आणि आस्ताद, आणि आस्ताद तर या टीम चा असूनही या तेआमचा नाही अश्या प्रकारे खेळतो त्यामुळे त्याचाही काही जास्त पर्फॉर्मेन्स बघायला नाही मिळाला. पुषक्र मात्र जिवाच्या आकांतने खेळत होता हे समोरच्या टीम ला कळाले आणि मग त्यानी पुष्करला नळाजवळ येउच द्यायचे नाही असे ठरवले, आणि मग काय शक्तिशाली राजेश ने पुष्कर ला असे काही आवळून ठेवले की पुष्करला हालनेही मुश्कील झाले, तिकडे आपले महिला मंडळामधे .रेशम ने सई ला टार्गेट करून तिला नळापसुन दूर ठेवण्याचे काम करत होती पण एकट्या रेशम ला ती ऐकत नव्हती म्हणून स्मिता तिच्या जोडीला आली आणि या झटापटीत सई चे कपडे रेशम ने ओढले आणि तिचे जॅकेट फाडले. सई ने विरोध केला पण रेषाम उलट तिच्या अंगावर ओरडून बोलत होती की मारामारी करायची नाही आणि हाच रट्टा तिने चालू ठेवला.

big boss marathi day 30
big boss marathi day 30

आउ च्या वयामुळे त्यानी दुरून डोंगर साजरे या म्हणीला दुजोरा दिला. टास्क दरम्यान बर्‍याच वेळा एकमेकन खेचाखेची करण्याचे प्रकार, चावणे, ढकलणे, केस ओढणे असे प्रकार पाहायला मिळाले, पण टास्क च्या शेवटी शेवटी पाणी भरण्याच्या झटापटीत सई पडली आणि तिच्या कमरेल जबर मार बसला, तिला दोन जननी उचलून सीक्रेट रूम मधे नेले, डॉक्टर आले , त्यानी चेकउप केले आणि सई ला आराम करण्याचा सल्ला दिला. या प्रमाणे आजच्या दिवसाचा अवधी समाप्त झाला.

उद्या बघुया अजुन ही लोक कोणत्या स्तरावर जाउन खेळणार आहेत.