अमृताने कापला करीनाने ऑर्डर केलेला अश्लिल केक, व्हिडिओ बघून थक्क व्हाल!

amrita-birthday-cake-karina-kapoor

अभिनेत्री अमृता अरोरा आज तिचा 40 वा वाढदिवस अनेक बड्या सेलिब्रिटींच्या उपस्थितीत गोव्यात साजरा करत आहे. यामध्ये अमृताचे पती शकील लडाक, मलायका अरोरा, करीना कपूर खान,करिश्मा कपूर,महीप कपूर हे तिथे हजर आहेत. आपला 40 व वाढदिवस साजरा करण्यासाठी अमृता अरोरा, करिष्मा कपूर, करीना कपूर, बहीण मलायका आणि पतीसोबत कहरेटर प्लेनने गोव्याला पोहचले होते.

अमृता ही करीनाची बेस्ट फ्रेंड असल्याने करिनाने तिच्यासाठी केक आणला होता. आपल्या खास मैत्रिणीचा वाढदिवस करीनाने रात्री 12 वाजता सेलिब्रेट केला. पण करिनाने आणलेला हा केक आता चर्चेचा विषय बनला आहे. या केक कापण्यावरून चाहत्यांकडून त्यांच्यावर टीकाही करण्यात येत आहे. या केकचा व्हिडीओ जेव्हा समोर आला तेव्हा सर्वच हैराण झाले आहेत. सुरुवातीला अमृताने हा केक कापण्यासाठी असमर्थता दाखवली पण न नंतर तिने तो केक कापला. ज्यांना आपण रोल मॉडेल समजतो त्यांनी असे केक कापून वाढदिवस साजरा केल्यामुळे चाहत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

ट्रायबल थीमवर या पार्टीचे अगोदरच प्लॅनिंग करण्यात आल्यामुळे गर्ल गँग ट्रायबल लूकमध्ये ड्रेसअप होऊन पार्टीत पोहोचली.आपल्या मैत्रिणीच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये त्यांनी कुठलीही कसर शिल्लक ठेवली नाही.सर्व जणी यावेळी ग्लिटरी आउटफिट्स आणि फेदरी हेडबँड्स लावून दिसल्या.बर्थडे गर्ल आणि करीना-करिश्मा यांनी गोल्डन ड्रेस परिधान केला होता.तर मलायका व्हाइट शॉर्ट्स आणि ब्लॅक क्रॉप टॉपमध्ये दिसली. या पार्टीत करीनाचा पती सैफ अली खान,सीमा कपूर,रीतेश सिधवानी आणि त्याची पत्नी डॉली सिधवानी,नताशा पूनावाला हजर होते. वाढदिवसात अशाप्रकारे अश्लील केप कापून ते सोशल मीडियावर टाकणे मात्र चुकीचेच आहे.