नवी मुंबईकरांसाठी दिलासा: इमारत पुनर्विकासासाठी किंवा घर खरेदीच्या व्यवहारासाठी सिडकोची गरज नाही.

navi-mumbai

सिडकोने वसवलेल्या नवी मुंबई शहरात, गेली ४० वर्षांपासून घराची खरेदी विक्री सिडकोच्या माध्यमातर्फे करण्यात येत होती. गेल्या काही वर्षांपासून, नवी मुंबई शहराची जमीन फ्री-होल्ड व्हावी म्हणून पाठपुरावा घेण्यात येत होता.

नुकत्याच घेण्यात आलेल्या सिडको, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्रांच्या बैठकीत नवी मुंबईच्या सर्व घरांना फ्री-होल्ड करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. लवकरच सिडको या संदर्भात प्रस्ताव शासन दरबारी देणार आहे. यापुढे नवी मुंबईत घर खरेदी विक्री करताना जो सिडकोला देण्यात येणारे ट्रान्सफर चार्जेस माफ करण्यात येणार आहे. तसेच शहरातील इमारत पुनर्विकासासाठी सिडकोच्या परवानगीची गरज भासणार नाही आहे. राज्य सरकारचा हा मोठा निर्णय असून, याचा नवी मुंबईकरांसाठी नक्कीच फायदा होणार आहे.