बिग बॉस मराठी: राजेश आणि त्याचे काही भक्त वगळता, रेशम टिपणीस घरातील सर्वात नावडती व्यक्ती

resham tipnis rajesh shingrapure

जरी खूप लोकाना असे वाटत असेल की बिग बॉस हा एक फेक शो आहे, पण मागच्या काही दिवसातून मिळालेल्या लोकांच्या प्रतिसादामुळे बिग बॉस मराठी हळूहळू लोकांच्या मनामधे स्थान मिळवायला लागले आहे. बिग बॉस हाउस मधील काही सदस्याना लोकाकडून प्रेम आणि काहीना तिटकारा सहन करावा लागतोय.

मागच्या काही दिवसा पासून चर्चेत असणारी रेशम हळूहळू लोकांच्या मनात खलनायीका या भावनेने घर करत आहे कारण तिच्या वागण्याच्या आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे ती लोकांची नावडति झाली आहे. राजेश च्या एक आठवड्यातल्या अध्न्यातवासामुळे रेशम खचून गेली आहे आणि म्हणून ती बाकी सदस्या सोबत चांगली वागायचा प्रयत्न करतेय असे वाटत असताना बिग बॉस ने राजेश ला पुन्हा बिग बॉस हाउस मधे पाठवले आणि शांत झालेली रेशम पुन्हा चवताळली, तिने पुन्हा घरात आपले जुने रूप दाखवायला सुरवात केली, राजेच ने पण घरात शिरताच रेशम ला मिठीत घेऊन बराच वेळ उभा होता, बाकीचे सदस्य त्यांच्याकडे पाहत उभे होते, कहीना अश्रू अनावर झाले तर काहीना तो घरात आल्यामुळे अजुन टेन्षन आले की आता पुन्हा रेशम चे नखरे सुरू होतील.

सहा दिवस एकटा एका खोलीत राहिल्यामुळे घरात शिरताच राजेशचा आनंद गगणात मावत नव्हता, या सहा दिवसात राजेश चे रेशम वरचे प्रेम अजुनच वाढलेले दिसत होते, राजेश ने पुष्कर ला त्याचा डबल बेड तू आम्हाला दे कारण आज पासून मे आणि रेशम एकत्र झोपनर आहोत असे सांगितले, हे ऐकल्यावर सर्व घरातील सदस्य हैराण झाले पण कुणी त्याला काहीच नाही बोलले.

अजुन बिग बॉस च्या चाहत्याना काय काय बघायला मिळणार आहे कुणास ठाऊक .