मुंबई: गोरेगावमध्ये स्कूल व्हॅनला आग

goregaon-school-vhan

मुंबईमधील गोरेगाव वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर फ्लायओव्हर जवळ एका स्कूल व्हॅनला आग लागल्याची दुर्घटना दुपारी सव्वा १२ वाजता घडली आहे. इंजिन ओव्हर हीट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता आहे. सुदैवाने व्हॅन मध्ये शाळेची मुले नव्हती. चालक आणि सहचालक व्हॅनमधून बाहेर पाडण्यात यशस्वी झाले. व्हॅन रिकामी असल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही आहे. सध्या आगीवर नियंत्रयन करण्यात आले असले तरी, व्हॅन पूर्णपणे जाळून खाक झाल्याचे कळते.