दिल्लीच्या राजपथवर मानाने डोलणार शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ

chitrarath-26-january-republic-day

भारताच्या यंदाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन असून, दरवर्षीप्रमाणे दिल्लीच्या राजपथावर हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होईल. ह्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यात सादर होणारे चित्ररथ. दरवर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाने लक्ष वेधून घेतले आहे. यंदाचा चित्ररथ ही महाराष्ट्राचा अभिमान वाढवेल असा आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’ ह्या घोषात शिवराज्याभिषेकावर आधारित असलेला चित्ररथ दिल्लीच्या राजपथावर सादर केला जाणार आहे. यंदाच्या सोहळ्यात एकूण २३ चित्ररथ सहभागी होणार आहेत.

शिवराज्यभिषेक दर्शवणारा यंदाचा महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांची आहे, तर हि संकल्पना चित्रपट-कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारली आहे. जेव्हा हा चित्ररथ राजपथावरून जय भवानी जय शिवाजी असा उद्घोषणा करीत जाईल, तेव्हा तो दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्राचा मनाचा मुजरा असेल. चित्ररथाच्या प्रारंभी किल्ल्याची प्रतिकृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. तसेच ह्या ठिकाणी तोफा, ध्वज, तुतारी, भालेधारी मावळे यांच्ज्या प्रतिकृती आहेत. मध्यभागी, रायगडाची प्रतिकृती साकारली असून शिवराज्याभिषेकाचा सोहळा दर्शवला आहे. महाराष्ट्राच्या परंपरा दाखवणारा हा चित्ररथ यंदाही सगळ्यांच्या मनात जागा करेल, यात शंका नाही.